छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयो

छत्रपती संभाजीनगर मतदान 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. मात्र राज्यभरात अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्या. काही ठिकाणी EVMचे बटण दाबले जात नव्हते . तर काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावच सापडत नसल्याच्या घटना सकाळपासून समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मशीन बंद पडल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्येही घोळच असल्याचं समोर येतंय. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील व दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाल्यानंतरही मतदार यादीत त्यांचे नाव दिसत आहे.या सगळ्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे केवळ एका शहरात नाही तर मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरुवात बंद मशीनने झाली आहे. निवडणूक आयोगाने घातलेल्या घोळामुळे मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची फरफट होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत

निवडणूक आयोगाच्या या कारभारात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील व माझी शिवसेना नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर आता तब्बल 10 वर्ष उलटल्यानंतरही त्यांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर त्रुटीमुळे निवडणूक प्रशासनाचे कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मतदानादरम्यान छत्रपती संभाजी नगर शहरातील गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर हे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.तब्बल तासभर ईव्हीएम मशीन बंद असल्याने ती दुरुस्त करायला जवळपास तासाभराचा विलंब झाला. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले.  एकीकडे मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याचा प्रकार समोर येत असताना दुसरीकडे मतदान केंद्रावरील तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर शंका उपस्थित केली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.