ऑस्ट्रेलियाचं एक वादळ शांत झालं! स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा आक्रमक आणि स्फोटक ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने 38 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  मॅक्सवेलच्या या निर्णयामुळे त्याच्या एका वादळी व यशस्वी कारकिर्दीचा सांगता झाली आहे. २०१२ मध्ये पदार्पण करणाऱ्या मॅक्सवेलने फलंदाजी, गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये विशेष करून मर्यादित षटकांचा तोडफोड फलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तो ऑस्ट्रेलियाच्या 2015 आणि 2023 च्या विश्वचषक विजेत्या संघांचा महत्त्वाचा शिलेदार राहिला आहे. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील. ‘क्रिकइन्फो’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मॅक्सवेलने आपल्या कारकिर्दीत 149 एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये 126.71 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 3,990 धावा केल्या, ज्यात 4 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 130 सामन्यांमध्ये त्याने 154 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 5 शतके व 12 अर्धशतकांच्या मदतीने 2,897 धावा कुटल्या. केवळ फलंदाजीच नव्हे, तर ऑफ-स्पिन गोलंदाजीत त्याने एकदिवसीय सामन्यांत 77 आणि टी-20 मध्ये 51 फलंदाज तंबूत धाडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमध्येही आरसीबी, पंजाब किंग्स आणि दिल्लीसारख्या संघांकडून खेळताना त्याने 141 सामन्यांत 161 षटकारांसह 2,899 धावा करत चाहत्यांचे तुफान मनोरंजन केले.

Comments are closed.