बारामती आणि राहुरीत सरासरी 60 टक्के मतदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, 23 एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झाले. बारामतीमध्ये 58.27 टक्के तर राहुरीत 60.00 टक्के मतदारांनी हक्क बजावला.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेत पोटनिवडणूक होत असून महायुतीकडून अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढत असून महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी भाजपकडून अक्षय कार्डिले तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून गोविंद मोकाटे रिंगणात असून निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.