विशेष टेस्ट स्ट्रीप दूध भेसळ रोखणार – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली असून येत्या सहा महिन्यांत तिचा वापर सुरू करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. त्याचबरोबर आयआयटी मुंबईतील संशोधकांच्या मदतीने भेसळविरोधी एआय यंत्रणा तयार करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आज ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन बोर्डच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रीप विकसित करण्यात आली असून ही स्ट्रीप युरिया तसेच इतर भेसळ घटक ओळखण्यास सक्षम आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले. राज्यात सध्या 40 टक्के दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते. उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येत असल्याने त्यात भेसळीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आढळते, असे ते म्हणाले.

Comments are closed.