माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना ‘दे धक्का’

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) थेट मैदानात उतरल्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील (Baramati) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या पॅनेलमधील उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र सकाळपासून पाहायला मिळालं. मात्र, आता तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवार राजश्री कोकरे आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे, कारखाना निवडणुकीत महिला गटातून तावरेंच्या पॅनेलला मिळालेलं हे पहिलं यश म्हणता येईल. येथील निवडणुकीत (Election) एकूण 4 गटांनी आपले उमेदवार उभे केले असून अजित पवार आणि चंद्रकांत तावरे यांच्या गटातच प्रमुख लढत असल्याचे दिसून येते. तर, शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलनेही उमेदवार उभे केले आहेत.

शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 7,722 मतदानापैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त 251 मतं मिळाली. आता, महिला राखीव प्रवर्गातून तावरे गटाला पहिलं यश मिळत असल्याचं दिसून येत आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणीमध्ये महिला राखीव प्रवर्ग गटामधून अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मते मिळाली आहेत. तर, सहकार बचाव पॅनेलच्या ज्योती मुलमुले यांना 648 मतं आहेत. दुसरीकडे तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मते, निलकंठेश्वर पॅनलच्या सुमन गावडे यांना 551 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत राखीव महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर असून सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या देखील आघाडीवर आहेत. त्यामुळे, तावरे गटाच्या पॅनलमध्ये महिला प्रवर्गात पहिल्या उमेदवाराला यश मिळत असल्याचं दिसून येते. दरम्यान, अजित पवार गटाचे रतनलाल भोसले 441 मतांनी आघाडीवर असून नितीन कुमार शेंडे 425 मतांनी आघाडीवर आहेत.

इतर मागास प्रवर्गामध्येही अजित पवारांचा उमेदवार पुढे

इतर मागास प्रवर्गाची 2,680 मते मोजून झाली आहेत. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे हे 197 मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी पॅनलचे रामचंद्र नाळे हे पिछाडीवर आहेत.

माळेगावसाठी चार पॅनेल रिंगणात

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.

Ajit Pawar Won : ब वर्ग गटातून अजित पवार विजयी

या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध ठरली. त्यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.

क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला?

माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झाले असले तरी बाकी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झालं आहे. मत पत्रिका छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर मतमोजणी होईल. क्रॉस वोटिंगचा फटका कुणाला बसणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.  दरम्यान अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांचे पॅनेलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर आहेत..अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत.

हेही वाचा

शक्तिपीठ महामार्गास 2 मंत्र्यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनो दगडं तयार ठेवा

आणखी वाचा

Comments are closed.