Beed crime news – कॅफेमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, तरुणाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माजलगाव येथे कॅफेमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान रहीम शेख असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ग्रामीण भागातून असून शहरातील एका कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेते. वर्गमैत्रिणीकडून घेतलेली प्रॅक्टिकल बूक देण्यासाठी ती बसने माजलगावला आली होती. कॉलेज समोरील कॅफेमध्ये दोघी भेटणार होत्या. यावेळी कॅफेमध्ये उपस्थित अरमान रहीम शेख याने मैत्रिण येऊपर्यंत माझ्याशेजारी बस असे म्हटले आणि पीडितेला हाताला धरून टेबलच्या बाजूला बसवले. त्यानंतर जबरदस्तीने गैरवर्तन केले. कॅफेतील इतर मुलांनी पीडितेला त्याच्या तावडीतून वाचवले. ही घटना पीडितेने घरी आईला सांगितली. त्यानंतर अरमानविरुद्ध शहर पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे प्रमुख महेश भोसले हे करत आहेत.

Comments are closed.