अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; माजलगावात प्रशासनाची धा

बीड क्राईम न्यूज : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात (Beed Crime News) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीररीत्या (Crime News) खालावली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र, चौकशीअंती संबंधित तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. गर्भपातासाठी शासनाने घालून दिलेले नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत आहेत. उपचारानंतर संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Beed Crime News : पोलिसांकडून आरोपींचा शोध प्रारंभ

दरम्यान, बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पती, सासू सासरे आणि पीडितेच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोघेतलास आरोपींचा शोध घेत आहेत.

Majalgaon Crime : शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी पतीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई

माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. दरम्यान, 9 जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस तसेच पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.