बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा ध
Beed Crime Walmik Karad: बीडच्या (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Sarpanch Santosh Deshmukh) मोठी घडामोड समोर आली आहे. वाल्मीक कराडची (Walmik Karad) पुनर्विलोकन याचिका (Revision Petition) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. परिणामी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा धक्का दिला आहे. न्यायमुर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमुर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड याने जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पिटीशन) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. सत्र व उच्च न्यायालयाने जामीन फेटल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात जमानत मिळण्यासाठी धाव घेतली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने अविनाश नकार दिला. या फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी कराडच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 14 जुलै 2026 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्या. एम एम सुंदरेश आणि न्या. एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करत न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटले कि, ‘ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही कृती किंवा चूक नाही, ज्यामुळे त्यावर पुन्हा पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासेल’ अशी टिप्पणी नोंदवली. परिणामी कराडची पुनर्विलोकन याचीका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Flashback : संपूर्ण चित्रपटगृहासारखा थरार
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात सुदर्शन घुलेच्या शेतात नेले होते. तिथे आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅस पाईपने बेदम मारहाण केली. त्यांचे हात-पाय तोडून त्यांना अक्षरशः हालहाल करून मारण्यात आले.
अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हे अमानुष हत्याकांड सुरू असताना आरोपींनी वाल्मिक कराड या परळीतील गुंडाला ‘व्हिडिओ कॉल’ (Video Call) करून हा सगळा प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आला होता. वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता.
या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात तब्बल 1,800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांना हत्येचे थेट 15 व्हिडीओ आणि 8 फोटो मिळाले आहेत. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना आणि आनंद साजरा करताना स्पष्ट दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. 12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती. संपूर्ण भक्कम पुरावे पाठीशी असल्याने आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला कारागृहातच ठेवण्याचा निर्णय दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments are closed.