‘तुला लय मस्ती आली’ म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक

बीड क्राईम न्यूज : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) शहरात भर बाजारात एका तरुणावर टोळक्याकडून लोखंडी रॉड आणि पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात (Parli City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका युवकाला काही जणांनी अडवले. “तुला खूप मस्ती आली आहे, तू आमच्या विरोधात काम केलेस,” असे म्हणत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.

Beed Crime News:  पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

ही घटना भर बाजारात घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीचा प्रकार पाहताच आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमी युवकाची सुटका केली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख हशब, शेख हाफिज, शेख शोफुला, शेख साकेब आणि शेख आलिम या पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

Nashik Crime News: निफाडमध्ये डॉक्टर दांपत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून डॉक्टर दांपत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात तिघा तरुणांनी डॉ. प्रशांत कांडेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कांडेकर यांना मारहाण करत हॉस्पिटलची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यावेळी महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. महिला दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सायखेडा परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी सायखेडा पोलीस ठाणे येथे घेराव घालत रस्ता रोको आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी या प्रकरणात आकाश जाधव, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण…; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.