अल्पवयीन मुलीवर मामेभावाचा बलात्कार, तपासणीसाठी डॉक्टरांनी आठ तास ठेवले ताटकळत; नातेवाईकांनी व्यक्त केला संताप
केजमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तोंडाला रुमाल बांधून तिच्या मामेभावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे, मात्र त्यानंतर पीडित मुलीला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तिथे तिची दखलही घेतली गेली नाही. कहर म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात 8 तास त्या पीडित मुलीला तातकळत ठेवण्यात आले. त्यामुळे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
केज पोलीस पीडित तेरा वर्षीय मुलीला वैद्यकीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिची तिथे पण फरपट करण्यात आली तिची दखल घेण्यात आली नाही. तब्बल 8 तास पीडितेला ताटकळत ठेवण्यात आल्याची माहिती तापसी पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी दिली. या विषयी डॉक्टर यांनी पण ओ पी डी ला जास्त गर्दी असल्याचे कारण पोलिसांनी दिले. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे
या प्रकरणी केज पोलिसात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी मामे भावा विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. त्याला अटक करून बुधवारी सायंकाळी केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत..पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपासकरीत आहेत.
Comments are closed.