संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; कपड्यांच्या दुकानात शिरला, प्रेयसीला लाथा-बुक्क्यांनी अन् चापटांनी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात एका कपड्यांच्या दुकानात घुसून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयावरून झालेल्या वादातून (Pimpri Chinchwad Crime news) हा प्रकार घडला असून, संतप्त तरुणाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी आणि चापटांनी अमानुषपणे मारहाण (Pimpri Chinchwad Crime news) केली. हा सर्व थरार दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.(Pimpri Chinchwad Crime news)

विशेष म्हणजे, प्रेयसीला बेदम मारहाण केल्यानंतर या तरुणाचा राग शांत झाला आणि त्याने तात्काळ दुकानातच प्रेयसीचे पाय धरून तिची माफी मागितली. हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Pimpri Chinchwad Crime news) झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र, इतका गंभीर प्रकार घडून आणि अमानुष मारहाण सहन करूनही संबंधित तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार देण्यास साफ नकार दिला आहे. हा आमचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत तिने कारवाई करण्यास नकार दिला असला, तरी या घटनेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Pimpri Chinchwad Crime news)

या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे झालेल्या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुण संतापाच्या भरात तरुणीला मारहाण करताना दिसत आहे. दुकानातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी मध्ये पडून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काही क्षणांतच आरोपीने आपली चूक लक्षात आल्याने प्रेयसीची माफी मागितल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.(Pimpri Chinchwad Crime news)

Raigad Crime News: अल्पवयीन तरुणी हत्याप्रकरणात आरोपीला अटक

रायगडच्या माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी मधील एका 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीची धारधार शास्त्राने हत्या करण्यात आली. या तरुणीचा मृतदेह गावालगत असणाऱ्या डोंगराळ भागात सापडला होता, त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच या प्रकरणी चार वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये माणगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम उतेकर असं या आरोपीचे नाव असून आरोपी हा या तरुणीच्या गावातील असल्याची पोलिस तपासात माहिती उघड झाली आहे. मात्र ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली. हत्येमागचे कोणते कारण आहे याचा पोलिस अधिक शोध घेत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.