भंडाऱ्यात बँकेच्या सहाय्यक प्रबंधकानेचं लुटली कॅनरा बँक, 1 कोटी 50 लाखांची रक्कम लंपास
भंडारा क्राईम न्यूज : भंडाऱ्याच्या (Bhandara) तुमसर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या सहाय्यक प्रबंधकानेचं चिखला माईन्सच्या सीतासावंगीची कॅनरा बँक (Canara Bank) लुटल्याची घटना घडली आहे. आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आली होती. बँकेतील तब्बल 1 कोटी 50 लाखांची ही चोरी झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर भंडारा पोलिसांनी (Police) तपासाची चक्र वेगानं फिरवली.
बँकेच्या सहाय्यक प्रबंधकानेच चोरी केल्याचं उघड
पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर ही चोरी बँकेतीलचं एखाद्या कर्मचाऱ्यानं केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. बँकेच्या एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी नागपूरला गेलेल्या बँकेचा सहाय्यक प्रबंधक मयूर नेपाळे (32) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं बँकेतील रक्कम चोरल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी झालेल्या रकमेतील काही रक्कम ताब्यात घेतली आहे. मात्र, अद्यापही संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आलेली नाही. त्या दृष्टीनं भंडारा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.
परभणीच्या पुर्णेत 30 लाखांची रोकड जप्त, जप्त केलेली रक्कम एका बँकेची असल्याची प्राथमिक माहिती
परभणीच्या पूर्णा शहरात आज 30 लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणूक स्थिर तपासणी पथकाने एका चारचाकी वाहनातून पकडली आहे. पुर्णेतून ह्युंदाई कंपनीची औरा ही MH 26 BX 6596 क्रमांकाची गाडी जात होती. यावेळी पुर्णेत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या पथकाने राजमुद्रा चौकात ही गाडी अडवली होती. त्यानंतर पथकाने तपासणी केली असता गाडीत एका बॅग आढळली. या बॅगेमध्ये तब्बल 30 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. या रकमेबाबत गाडी चालकाला विचारले असता, त्याला याबाबत योग्य ते उत्तर देता आले नाही. त्यामुळं पोलीस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने हे पैसे जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम एका बँकेची असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही रक्कम नेमकी कुठे आणि कशासाठी? जात होती? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. ही रक्कम जरी एका बँकेची असली तरी ती कुठे जात होती? असा सवाल उपस्थित राहत आहे. त्यामुळं चौकशी सुरु करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar Crime : बँक कर्मचाऱ्याला 25 लाखांना लुटलं; पोलिसांनी अवघ्या 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 31 लाख 56 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त
आणखी वाचा
Comments are closed.