भंडाऱ्यात पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती; सागवान तस्करीचा सिंडिकेट वन विभागाच्या जाळ्यात
भंडारा क्राईम न्यूज : लाल चंदन तस्करीचं रॅकेट कशा प्रकारे चालविलं जातंयांचं सिंडिकेट कशाप्रकारे आहे, हे सगळं आपल्याला पुष्पा (Pushpa) या बहुचर्चित सिनेमातून बघायला मिळालं. काहीसा असाचं प्रकार भंडाऱ्यातही (Bhandara Crime) उघडकीस आलाय. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सागवान वृक्षाची अवैध वृक्षतोड करून ती सीमावर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातून नागपूरमुंबईपर्यंत त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सिंडिकेटचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानं वन विभागात (Forest Department) मोठी खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातून वृक्षाची तोड करून चुकीच्या पद्धतीचे हॅमर आणि कागदपत्र तयार करून त्याची एका ट्रकमधून वाहतूक सुरू असताना हा ट्रक भंडारा वन विभागाच्या जाळ्यात अडकला. या ट्रकमधील सर्व सागवान लाकडांची तपासणी केलेली असता सोबत असलेला वाहतूक परवाना (TP) आणि लाकडांवर असलेला हॅमर यात मोठी तफावत असल्याचं आढळून आलं. यावरून भंडारा वन विभागानं हा ट्रक ताब्यात घेतला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या बपेरा वन विभागाच्या नाक्यावरून हा ट्रक पुढील प्रवासासाठी निघाला असताना ही कारवाई करण्यात आली.
Bhandara Crime : 8 दिवसानंतर गुन्हा नोंदविलाभंडारा वन विभागाची अक्षम्य दिरंगाई
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात या बपेरा नाक्यावरूनच पुढील प्रवास करावा लागतो. 1 डिसेंबरला ट्रॅक ताब्यात घेतला. मात्र, वन विभागाने गुन्हा तब्बल 8 दिवसानंतर नोंदविण्यात आला. ट्रॅक जप्त करताचं कलम 52(2) नुसार कारवाई करून लगेच 24 तासात प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण पाठवायला हवं होतं. मात्र, भंडारा वन विभागानं यात अक्षम्य दिरंगाई केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलंय. या नाक्यावर वन विभागानं केलेल्या मध्यप्रदेशच्या सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती आता संपूर्ण संशयास्पद असून सागवान लाकडांचं हे संपूर्ण सिंडिकेट चालविण्यासाठी मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातीलही काही वन कर्मचारी त्यांना मदत करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भंडारा क्राईम न्यूज : आसा होईल कार्यक्रमक्रम
– हरदोली इथून 1 डिसेंबरला ट्रॅक ताब्यात घेतला.
– ट्रकमध्ये 197 सागवान लाकूड नगांची TP असताना प्रत्यक्षात 215 सागवान लाकूड नगची वाहतूक करण्यात येतं होती.
– यात हॅमर असलेले केवळ 50 लाकूड नग होते. तर, तब्बल 165 नगावर हॅमर नाही.
– 9 लाखांचा 15.641 घनमिटर लाकूड वन विभागानं ताब्यात घेतला आहे.
– 1 डिसेंबरला ट्रॅक ताब्यात घेतला. मात्र, वन गुन्हा तब्बल 8 दिवसानंतर नोंदविण्यात आला.
– ट्रॅक जप्त करताचं कलम 52(2) नुसार कारवाई करून लगेच 24 तासात प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण पाठवायला हवे होते. मात्र, – भंडारा वन विभागानं यात अक्षम्य दिरंगाई केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.