भिवंडी पालिकेच्या सभागृहावर खासगी व्यक्तीचा ताबाआयुक्तांची झाडाझडती
भिवंडी महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचा खासगी व्यक्तींकडून अनधिकृत वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त अनमोल सागर यांनी आज शहरातील विविध मालमत्तांची झाडाझडती घेतली. यावेळी सहयोगनगर येथील देविदास गुळवी सभागृहाचा ताबा एका खासगी व्यक्तीकडे असल्याचे उघड झाले.
महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी असलेल्या या सभागृहाची पाहणी केली. यावेळी या सभागृहाची चावी अनिलकुमार गुप्ता या खासगी व्यक्तीकडे असल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.