फडणवीस हे गजनी नाहीत तर राजकारणातील रजनीकांत, सपकाळांच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला
भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत आहेत, असं म्हणत सपकाळ यांच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत
देवेंद्र फडणवीस हे गजनी नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत आहेत. तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा आजार झाला असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे. 2014 पूर्वी राज्यात लोडशेडिंग होते भ्रष्टाचार बोकाळला होता असे नवनाथ बन म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे रजनीकांतप्रमाणे सुपरहिरो म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र्राला नंबर एक बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तुम्हाला स्मृतीभ्रंश झाल्याने तुम्हाला आठवणार नाही असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका, सपकाळांची टीका
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका, दरिंदा देवेंद्र फडणवीस असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळी यांनी केली होती. बीड जिल्ह्यात नार्को टेस्टची चर्चा होते आहे. पण कुणाची नार्को टेस्ट करा नाहीतर न करा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. जाती-जातींत भांडण लावणाऱ्या फडणवीसांची नार्को टेस्ट झाली, तर सगळे सत्य बाहेर येईल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बीड जिल्ह्यात मी मागच्या सहा महिन्यापूर्वी आलो होतो. आणि इथून सद्भावना यात्रा काढली होती. आताही पुन्हा एकदा आलो आहे. इथल्या जातीयवादाला मूठमाती आपण द्यावी,’ असे आवाहनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले. सपकाळ यांच्या टीकेनंतर भाजपच्या कार्यतर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. सपकाळ यांची जीभ घसरल्याने त्यांनी फडणवीसांविषयी वापरलेले अपशब्द अमान्य असून, त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या:
भाजपकडून नातेवाईकांसह गुंडागर्दी करणाऱ्यांना लोकांना तिकीट, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार
आणखी वाचा
Comments are closed.