सोलापुरात ‘त्या’ पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक
बीड : सोलापूर महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमधील (BJP) नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे (Solapur) ज्येष्ठ तथा माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. तसेच, भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली होती. आता, सुभाष देशमुख यांच्या भूमिकेवर जयकुमार गोरेनी (जयकुमार गोरे) प्रतिक्रिया दिली आहे. नेत्याला कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणे साहजिक आहे. निवडणूक लढवत असताना पक्ष ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते, त्यामागे उभे राहण्याची जबाबदारी असते. नेतृत्वाने त्या भावना व्यक्त केल्या आहेत, कदाचित कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी केलेल्या आहेत. त्यामुळे, सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचे वाटप होईल, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.
सुभाष देशमुख यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे, त्या पक्षात गेलेल्या लोकांची काम करू, अशी वेळ कोणत्याही नेत्यावर येणार नाही, अस जयकुमार गोरे यांनी म्हटले. तसेच, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या नाराजीबद्दलही जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली. दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी जे सांगितले त्यात सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी दिली.
सोलापुरात शिवसेनेकडून 50 जागांची मागणी
सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने 50 जागेची मागणी केली, त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. युतीची चर्चा चालू आहे, सोलापुरात पोहोचल्यानंतर त्याबाबत चर्चा पुन्हा होईल. सर्व गोष्टी मिळून जुळून आल्या तर नक्कीच महायुती होईल, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी युतीबाबत दिली. सोलापूर शहर भाजपचा बालेकिल्ला आहे, त्याठिकाणी तीनही आमदार भाजपाचे आहेत. सत्तादेखील भाजपची होती, त्यामुळे भाजपाची प्रचंड मोठी संख्या आहे. सर्वांना विचारात घेऊन न्याय दिला जाईल, असेही गोरे यांनी म्हटले.
सोलापुरात भाजप नेत्यांचा निष्ठावंत पॅटर्न
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा ‘निष्ठावंत पॅटर्न’ सुरु झाला आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान केल्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जर भाजपमधून आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करु असे देशणुख म्हणाले.
हेही वाचा
2026: एक जागा, दोन इच्छुक उमेदवार; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसे अन् ठाकरे गटात चुरस
आणखी वाचा
Comments are closed.