आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का? आपल्या मर्यादेत राहा, अन्यथा तुला सोडणार नाही; प्रवीण

मनोज जारानरेंज पाटीलवरील प्रवीण दरेकर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटीवरून मुंबईकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आईविषयी अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणावरून भाजप नेते सोशल मीडियावर सकाळपासून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत करत आहेत. आता यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिलाय.

आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का?

प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, मात्र देवेंद्रजींची पैदास काढणं ही विकृती आहे. आम्ही त्यांना जरांगे म्हणायचो, दादा म्हणायचो.  मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मराठा समाजाचे फक्त आपणच आहोत या आविर्भावात राहायचं. मुख्यमंत्र्यांच्या आईंचा जरांगेंनी अपमान केलाय. शिवराळ भाषा वापरली.  आम्ही तुम्हाला चिंधीचोर, हराXXX बोलू का? तू कोण जरांगे? आपण आपल्या मर्यादेत राहा. अन्यथा आम्ही तुला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

जरांगे आंदोलन कर, मात्र असं काही बोलू नको

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, सुसंस्कृत माणूस कोणीही असं बोलू शकणार नाही.  जरांगे आंदोलन कर, मात्र असं काही बोलू नको. मराठा समाजाच्या प्रश्नांसोबत फितुरी करु नको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहनशील आहेत. ते चर्चा करतील, असा हल्लाबोल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलाय. आता प्रवीण दरेकर यांच्या टीकेला मनोज जरांगे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नितेश राणेंचाही मनोज जरांगेंना इशारा

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलाय. नितेश राणे म्हणाले की, जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहि‍णींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा कुठे झोपली होतीस? मनोज जरांगे चित्रा वाघांवर संतापले

आणखी वाचा

Comments are closed.