मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी अर्ज छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्याने उमेदवारांचे अर्ज बाद ठरत आहेत. मुंबईतील दोन प्रभागात भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही (Pune) भाजपच्या तीन उमेदवारांना फटका बसला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena)मोठा धक्का बसला आहे. येथील प्रभाग 24 मधील भाजपच्या तीन जागेवरील आणि शिंदेंच्या शिवसेना पक्षातील दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, आता येथील उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसलाय. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म जमा झाले होते. त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. आता, या जागेवर पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता हे पाहता प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकचं उमेदवार असेल तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढतील. त्यामुळे, येथील भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असून पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईत भाजपचे 2 ठिकाणी अर्जच नाहीत
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपच्या उमेदवाराचा अर्ज हा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे स्वीकारण्यात आला नाही. खुल्या प्रवर्गातील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्जही स्वीकारण्यात आला नव्हता. . मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपने एकप्रकारे अर्जच भरलेले नाहीत. त्यामुळे भाजपने या दोन वॉर्डांमध्ये इतर पक्षांना बाय दिल्याची चर्चा आहे.
मुंबईत ठाकरेंच्या 5 उमेदवारी अर्जावर आक्षेप
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गटाची धाकधूक वाढली असून त्यांच्या 5 उमेदवारांच्या उमेदवारी धोक्यात असल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या पाच उमेदवारांच्या अर्जावर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 41, 42 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवारांचा एबी (AB)फॉर्मवर डिजिटल सही असल्याचं निदर्शनास आले. या एबी फॉर्मवर डिजिटल सही असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.