खासदार रामराव वडकुते यांचे निधन, आठ महिन्यांपूर्वीच राज्यसभेवर निवड
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे आज पहाटे दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. हिंगोलीतील महाकालीनगर येथे मंगळवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या वडकुते यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आठ महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती.
Comments are closed.