अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई महापालिकेसाठी दुसरी यादी जाहीर, तिसरी यादी देखील येणार

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 27 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं पहिल्या यादीत 37 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली.   राष्ट्रवादीकडून मुंबईसाठी तिसरी यादी देखील जाहीर केली जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या मनीषा रहाटे, जाहिदा अहमद, काँग्रेसच्या माजी नगरसेविका वंदना साबळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाचा आशिष माने यासह कांचन बडे यांना उमेदवारी दिली आहे.

NCP List for BMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३),
२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)
3) अहमद खान (वॉर्ड क्र. 62),
४) बबन रामचंद्र मदने (७६)
५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)
६) सचिन तांबे (९३)
७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)
८) सज्जू मलिक (१०९)
९) शोभा रत्नाकर जाधव (११३)
१०) हरिश्चंद्र बाबलिंग जंगम (१२५)
११) अक्षय मोहन पवार (१३५)
१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)
१३) रचना रविंद्र गवस (१४३)
१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)
१५) सोमू चंदू पवार (१४८)
16) अब्दुल रशीद (कर्णधार) मलिक (165)
१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)
18) दिशा अमित मोरे (171)
१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)
२०) विलास दगडू घुले (४०)
२१) अजय विचारे (५७)
22) हादिया फैजल कुरेशी (64)
२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)
२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)
२५) अमित अंकुश पाटील (९५)
२६) धनंजय पिसाळ (१११)
२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)
२८) रत्न बनून (१३९)
२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)
३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)
३१) अंकिता संदीप द्रावे (१४७)
३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)
३३) डॉ. सईदा खान (१६८)
३४) बुशरा परवीन मलिक (१७०)
35) वासंती मुर्गेश देवेंद्र (175)
३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)
३७) श्रीम. फरीन खान (१९७)

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी

१) सौ. खादिजा इस्माईल मकवाना (६६),
२)डॉ. मनिषा चौधरी (८४)
३) श्रीम. संगीता वाजे (१०५)
4) रुक्सार अंजुमा मुस्तकीर खान (110)
५) मनिषा रहाटे (११९)
६) झाहिदा सिराज अहमद (१२४)
७) अ‍ॅड. शबाना रशीद शेख (१३४)
८)नेहा भगवानराव राठोड (१५६)
९) रीमादेवी सिंग (१६३)
10) प्रकाश ज्ञानदेव चौधरी (166)
11) मुस्कान समीर शेख (187)
१२) मंगेश बनसोडे (२०८)
१३) शाकीर अन्सारी (२११)
१४) फरान फरीद अन्सारी (७८)
१५) शिवाजी विनायक खडताळे (१०४)
१६)दीपा अनंत शेटे (११२)
१७) शबना अन्वर शेख (१२२)
१८) कांचन प्रशांत बडे (१२९)
१९) शब्बीर सिद्दीक खान (१४५)
२०) आशिष गडकरी (१५४)
२१) विद्या नवीनकुमार शिलवंत (१५५)
२२) आशिष महादेव माने (१५९)
२३) सतीश यादव (१६४)
२४) रेहाना आरिफ सय्यद (१७९)
२५) सारा डेरे (१९२)
२६) हर्षला हर्षद सुर्वे (२०९)
२७) शाकीर अन्सारी (२११)

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे. दुसरी यादी 27 उमेदवारांची जाहीर करणार असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलं होतं. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तिसरी यादी उद्या जाहीर केली जाणार आहे, असं सुनील तटकरेंनी म्हटलं. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत लढत आहे. पनवेलमध्ये आमचा पक्ष महायुती म्हणून लढत आहे, अशी माहिती सुनील तटकरे दिली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.