घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रु, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणाईला 1 लाख निधी

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC निवडणूक) निवडणुकासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंचच उंच इमारती उभारल्या आहेत. शिवसेना-मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे आज दादरमधील शिवसेना भवनमध्ये आले होते, येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. आम्ही यांच्यासारखं निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करत नाहीये. आपली सत्ता आल्यावर आपण हे करू, कोळी महिलांसाठी सुद्धा हे आपण करणार आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिले जाणार आहे.

आदित्य ठाकरेंकडून घोषणा

महापालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु करणार
10 वी नंतर ज्युनिअर कॉलेज BMC च्या माध्यमातून सुरु करणार आहोत
सर्व बोर्डाच्या शाळा सुरू करणार, त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल.

सुरक्षित पार्किंग- पार्किंगचा गंभीर विषय आहे.
जिथे जिथे BMC चा पार्किंग आहे ते मोफत
पार्किंसाठी आत्ता भाडे आकराणी केली जात आहेत.
1 फ्लॅटला एक पार्किंग असायला हवी

स्वयंरोजगार -हा महत्वाचा विषय आहे.
मुंबईत प्रत्येकला नौकरी हवी आहे. त्यासाठी,
एक लाख तरुण तरुणीना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहायता निधी देऊ

करप्रणाली- मुंबईकरांचे ओझे हलके करणार
आत्तापर्यत आपण 500 स्केअर फूटपर्यत मालमत्ता कर माफ केला होता.
मुंबईत पुन्हा आपली सत्ता आल्यास 700 स्केअर फूटपर्यतच्या
घरांना मालमत्ता कर माफ करू

पादचारी रस्ता – फुटपाथ आणि मोकळ्या जागा हव्यात.
नागरिकांना फुटपाथ हा मिळालाचं पाहिजे.
हे काम आम्ही हट्टाने करून घेणार

मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे
मुंबईत क्लायमेट ऍक्शन प्लॅन रबावायचा आहे.
पर्यावरण चा विचार हा करावाच लागणार

आर्थिक राजधानी-मुंबई सुसाट मुंबई
आपली मुंबईची काळजी कोण घेणार? BPT मध्ये 1800 एक्कर जागा मुंबईची आहे.
केंद्र सरकार आपला अधिकार गाजवत आहे, ती जागा आपल्याला घ्यावी लागेल.
गिफ्ट सिटीसारखं तिथे काम करावं लागणार आहे.
जमीन मिळण्यासाठी कोर्टाची लढाही लढू, पण ही जागा आपण घेऊ.

पाणी-वीज मोफत – 100 युनिटपर्यत वीज मोफत करू,
पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टकडून कशी वीज मिळेल याचा प्रयत्न करू
पाण्याचे दर सुद्धा स्थिर ठेवण्याचा काम करू.

युवा मुंबई, युवा मुंबईकर-
प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू

अमित ठाकरे काय म्हणाले

तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, आदित्य तर आमदार आहे, अशी साद अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना घातली. नाशिकमध्ये तपोवनात त्यांचा मंत्री म्हणतो झाड कापवेच लागणार, एवढा माज आहे. आपल्याला हा माज काढायचा आहे, घमंड तोडायचा आहे. आपण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर सुरु करणार आहोत. सगळ्या लहान मुलांची काळजी यामध्ये घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय आपण सुरु करणार आहोत. याशिवाय, मुंबईत आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरु करायचं आहे. अरली डिटेक्शन ज्याने होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रुग्णलाय सुरु करायचं आहे. कारण, मला माहितीये सुरुवातीला यामध्ये आहे किती त्रास होतो.

आदित्य आणि अमित ठाकरेंच्या मोठ्या घोषणा – जाहीरनामा

700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ
घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये,
कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण
तरुणांना लाख रु पर्यंत  रोजगार सहाय्यता निधी
बेस्ट बसचे तिकीट  कमी करून ५-१० १५-२० रुपये फ्लॅट रेट करणार
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर
पालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु करणार

हेही वाचा

मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका

आणखी वाचा

Comments are closed.