मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक

मुंबई: राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईबाई). महापालिकेत अखेर आज महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. तर, शिवसेनेच्या संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली असून त्यांचाही शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, मुंबई महापालिकेचं (BMC) कामकाज आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. तर, ठाकरेंच्या नगरसेवकांनीही सभागृहातून काढता पाय घेतला.

महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केले, यावेळी शिवसेना नेते उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. तर, किशोरी पेडणेकर यांनी शिंदेच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज विक्षिप्त होती, असा आरोप केला आहे. आता, त्यावर उपमहापौर संजय घाडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी माझी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी, आयुक्तांनी केली. महापौर आणि उपमहापौर यांची घोषण होऊन सभागृह संपलं आहे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमहापौर संजय घाडी यांनी दिली. काँग्रेसला महाराष्ट्रात जागा नाही, त्यांच्यासाठी जागा नव्हती, ठाकरेंचे नगरसेवक तिकडे बसले. मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी शहर आणि ग्रामीण भागात खुश आहेत. नगरसेवक आणि नगरसेविका त्यांचे आसन मिळण्याचा अधिकार होता, असं मनापासून वाटत. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभात्याग करणे हे वारंवार होईल. मात्र, आजच्या दिवशी होईल अस वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया घाडी यांनी ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलेल्या वॉक आऊटवर दिली. लोकशाहीला साजेल अस त्यांनी वागायला पाहिजे होते, जनतेने दाखवलं ना, खोके कोणाकडे आणि ओके कोण झाले ते. जिल्हा परिषदेत आमचे दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. मग त्यांनी विचारावं ओके कोण? असा सवालही घाडी यांनी केला.

महिला नगरसेवकांना खाली बसाव लागलं

कॉग्रेसच्या महिला नगरसेवकांना आज जमिनीवर बसावे लागले, आज आम्ही प्रदुषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलो होतो. मात्र आम्हाला बसायलाही जागा दिली नाही. भाजपच्या पहिल्या महापौर बसल्यानंतर आम्ही मात्र जमिनीवर होतो. देवाभाऊंची बहिण महापौराच्या खुर्चीवर आणि आमच्या बहिणी जमिनीवर होत्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांनी दिली.

किशोरी पेडणेकरही संतापल्या

आम्ही गोंधळ केला नाही, शिंदे गटानं बॉडी लँग्वेज वेगळी ठेवून घोषणाबाजी केली. मुंबईत महिला महापौर बसत आहेत, त्यांना शुभेच्छा. पण त्यांच्या बॉडी लँग्वेज आत्ताच अशा वाईट आहेत. शिंदेंच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज विक्षीप्त होती, असा आरोप ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

यथवंत किल्लेदार, मनसे, गटनेता

आम्ही पाठच्या मागी होतो, कलकलाट ऐकायला येत होता. घोषणा प्रति घोषणा सुरु होत्या. निवडणूक बिनविरोध होती, त्यामुळे बाकी काही घोषणांचा प्रश्नच नाही. महापौर आणि उपमहापौर निवडणूक होती, आज केवळ औपचारिकता बाकी होती. नेमकं काय झालं हे कळलं नाही, पेडणेकर यांनी आरोप केले हे आत्ताच कळलं. नियोजन दिसलं नाही, 227 नगरसेवक होते मग लोकांना बसायला का नाही मिळालं? असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

हेही वाचा

राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला

आणखी वाचा

Comments are closed.