अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदार आक्रमक, कंपनीवर गुन्हा दाखल
बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात्यामुळे बिना परवानगी उत्खनन आणि प्रेशर मशीन चालवल्याने पुण्याच्या नामांकित वॉटर फ्रंट कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाने (Revenue Department) 30 कोटी रुपये दंड आकारल्यानंतर तो न भरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुचर्चित सारंगवाडी प्रकल्पाचा मुद्दा भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधिमंडळात उपस्थित केल्यानंतर महसूल विभागाद्वारे हे कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
Buldhana Crime : आमदार श्वेता महाले यांनी मांडला विधिमंडळात समस्या अन् महसूल विभागाला आली जाग
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्याच्या सीमेवर 2009 साली मंजूर करण्यात आलेल्या सारंगवाडी प्रकल्पासाठी पुण्यातील नामांकित असलेल्या वाटर फ्रंट कंपनीने मेहकर तालुक्यातील हिवरा गाव हद्दीत 2013 तें 2015 या काळात महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केलं होतं. यात जवळ जवळ 10, 64,320 घनमीटर गौण खनिजाचे अवैधरित्या व कुठली परवानगी न घेता उत्खनन केलं. विनापरवानगी याच परिसरात क्रेशर मशीनच्या सहाय्याने ते वापरलं. त्यामुळे महसूल विभागाने या कंपनीला जवळपास 30 कोटी रुपयांचा दंड आकारला होईल. मात्र अद्यापही या कंपनीने हा दंड न भरल्याने चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला.
Buldhana Crime News : पुणे स्थित वाटर फ्रंट कंपनीचे दोन संचालकंवर गुन्हा दाखल
आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा उपस्थित करताच मेहकर महसूल विभागाला जाग आली व मेहकरचे तहसीलदार यांनी जानेफळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पुणे स्थित वाटर फ्रंट कंपनीचे दोन संचालक अनिल सुरेशचंद्र मुंदडा व हर्षद सुरेश मुंदडा या दोघांवर कलम 72/2026 क. 379, 48(7),48(8), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सह कलम 9 व 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम चार व 21 व खान आणि खनिज अधिनियम 1957 नुसार तीस कोटी रुपयांच्या वसुलीसाठी गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.