ऐन सणासूदीच्या काळात चांदीचे भाव गगनाला; प्रसिद्ध खामगावच्या गणेशमूर्तींची मागणी 40% घटली
बुलधाना बातम्या: राज्यासह देशभरात आज आपल्या लाडक्या बाप्पाच घरोघरी आगमन होत आहे. आज पासून गणेशोत्सवाची (Ganesh Utsav 2025) सुरुवात झाली आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील देशभरातील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेतुन दरवर्षी देशभरातून चांदीच्या गणेश मूर्तींची मोठी मागणी असे. खामगाव येथील सुंदर व सुबक अशा चांदीच्या मूर्ती देशभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे दरवर्षी खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी देशभरातून ग्राहक येतात. मात्र यावर्षी ऐन सणासुदीच्या दिवसात चांदीचे भाव गगनाला भिडल्याने यावर्षी चांदीच्या गणेश मूर्तींची मागणी 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसारचांदीचे भाव गेल्या 52 दिवसात 80 हजार रुपये प्रति किलोवरून 1 लाख 20 हजार 500 रुपये प्रति किलो वर गेले आहेत. चांदीचे भाव प्रचंड वाढल्याने ही मागणी कमी झाल्याचा सराफा व्यापारी सांगतात आणि यामुळे गणेश मूर्तींच्या मागणीत घट झाली. सोबतच चांदीची विक्री ही सरासरीच्या 20 टक्क्यांनी कमी झाल्यात समोर आल आहे.
सोन्यातील गुंतवणुकीवर 2025 मध्ये 27 टक्के परतावा,
गेल्या 10 वर्षात सोन्यातील गुंतवणुकीमुळं 11 टक्के रिटर्न दिला आहे. तर 2025 मध्ये सोन्यातील गुंतवणुकीवर 27 टक्के परतावा मिळाला आहे.1111 डॉलर प्रति औंसवरुन वाढून 3350 डॉलर प्रति औंसवर सोन्याचे दर गेल्या 10 वर्षात पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात जागतिक भू राजनैतिक संघर्ष आणि घडामोडींमुळं वाढ झाली. केंद्रीय बँकेकडून सोन्याची रेकॉर्ड ब्रेक खरेदी, युद्धजन्य स्थिती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात येत असलेले टॅरिफ यामुळं सोन्याचे दर वाढत आहेत. या सर्व कारणांमुळं सोन्याच्या दरात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांच्या मनात अनिश्चितता असल्यानं सोने दर वाढत आहेत.त्यामुळं या वर्षी सोने दरानं इक्विटी आणि बाँडपेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत.
जागतिक गोल्ड काऊन्सिलच्या डेटानुसार केंद्रीय बँकांच्या सोने खरेदीत या वर्षी घसरण झाली आहे. पहिल्या तिमाहीत 244 टन सोनं खरेदी करण्यात आलं तर, दुसऱ्या तिमाहीत 166 टन सोने खरेदी झाली. केंद्रीय बँकांनी पुढील 12 महिन्यात केंद्रीय बँकांनी त्यांच्याकडील सोने 43 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलीसांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने केल रद्द
पुण्यातील Vyaश्रामबाग, फरासखाना आणि खडकमाळ या तीन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी दारुची दुकाने गणेशोत्सवाच्या काळात सुरु ठेवण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी दिलीय. गणेशोत्सवाच्या संपुर्ण कालावधीत या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुची दुकाने आणि बार बंद ठेवण्याचा पुणे पोलीसांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलाय. या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबू गेणू, भाऊ रंगारी, अखिल मंडई यासारख्या प्रमुख मंडळांचा उत्सव साजरा होतो.
त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुची दुकाने गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या काळात बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पोलीसांनी घेतला होता. ज्यामुळे जळवपास साठ दारुची दुकाने अकरा दिवस बंद राहणार होती. या दुकानांच्या संघटनेकडून या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने दारु दुकानदारांची मागणी मान्य करताना गणेशोत्सवाचे पहिला , पाचवा , सातवा आणि शेवटचा दिवस विगळून इतर दिवशी दारुची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय दिलाय.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.