इस्लाम जिमखान्याला नमवत सीसीआय अजिंक्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परंपरेचा दरारा आणि आक्रमणाची धार या दोन्हींचा मिलाफ साधत क्रिकेट क्लब बंद इंडियाने (सीसीआय)शेवटचा सामन्यात इस्लाम जिमखान्याला ३१ धावांनी नमवत विजय मांजरेकररमाकांत देसाई स्मरणार्थ वीस-20 स्पर्धेचे विजेतेपद दणक्यात पटकावले. शिवाजी parp जिमखाना आयोजित या स्पर्धेत सीसीआयने चषकासह एक दशलक्ष रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर इस्लाम जिमखान्याला उपविजेतेपदासह पन्नास हजारांचा पुरस्कार मिळाला.

नाणेफेक जिंकून इस्लाम जिमखान्याचा कर्णधार विनायक भोईरने सीसीआयला फलंदाजीला पाचारण केले आणि तिथूनच सामना त्यांच्या हातातून निसटू लागला. अखिल हेरवाडकर आणि कर्णधार आकाश आनंद या सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच आक्रमणाचा भडिमार करत पहिल्याच सहा षटकांत बिनबाद 69 धावा फटकावल्या. गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत या जोडीने पहिल्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी उभी केली. हेरवाडकरने 21 चेंडूंमध्ये सात चौकारांसह 39 धावांची तडाखेबाज खेळी केली, तर आनंदने 36 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह 47 धावा जोडल्या.

मात्र यानंतर सीसीआयचा डाव थोडा डळमळला. मग डावखुऱया ध्रुमील मटकरने 24 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांसह 47 धावा ठोकत त्याने सौरभ सिंगसोबत पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली आणि संघाला 197 धावांचा भक्कम डोंगर उभा करून दिला.

197 धावांचा पाठलाग करताना इस्लाम जिमखान्याची सुरुवात आशादायक झाली, पण ती टिकली नाही. भूवन पाटीलने 35 धावा करत झुंज दिली, मात्र बद्रे आलम आणि इरफान उमेर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इतर फलंदाजांनी शरणागती पत्करली. एकामागून एक विकेट पडत गेले आणि अखेर 18.4 षटकांत 166 धावांवर इस्लाम जिमखान्याचा डाव संपला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी कसोटीपटू संदीप पाटील, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, शिवाजी पार्प जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, सचिव संजीव खानोलकर, संयुक्त सचिव सुनील रामचंद्रन, कार्याध्यक्ष दीपक मुरकर  यांच्या हस्ते पार पडला.

Comments are closed.