चंद्रपूरमध्ये 30 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून राहणार वंचित? 10 नगरसेवक मुंबईकडे रवाना

चंद्रपूर वार्ता: चंद्रपूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष असे 10 नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज अकोल्यात 10 नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे सर्व दहा नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे सर्व 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेना युतीचे 24 आणि हे 10 नगरसेवक मिळून मॅजिक फिगर असलेला 34 गाठण्याची शक्यता आहे. सत्तेच्या अगदी जवळ जाऊन देखील काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची शक्यता यामुळं निर्माण झाली आहे.

काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळं काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची शक्यता

राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजप महायुतीला (BJP)आपलं वर्चस्व मिळवता आलं नाही, त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) महानगरपालिका. येथील महापालिकेत 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आला नाही, 66 जागांचे संख्याबळ असलेल्या या महापालिकेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळं, काँग्रेसला 4 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौर बनवता येईल. मात्र, 30 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्येच (Congress) दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, विजय वडेट्टीवर यांनी चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे जबरदस्तीने उचलून नेले असा गंभीर आरोप प्रतिभा धनोरकर यांनी केला आहे.

चंद्रपुरात 100 टक्के भाजप सत्ता स्थापना करणार, भाजपचाच महापौर होणार, आमदार परिणय फुके यांचा दावा

आमचे सर्व नगरसेवक एकसंघ आहेत आणि काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरला बसेल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला आहे. असं असताना दुसरीकडे चंद्रपुरात 100 टक्के भाजप सत्ता स्थापना करणार, भाजपचाच महापौर होणार असा दावा भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांनी केला आहे. सोबतच जिथे जिथे हे गटागटात विभागलेले आहेत त्या काँग्रेसचे यापेक्षाही खराब हाल महाराष्ट्राची जनता करणार असल्याची टीकाही आमदार फुकेंनी केली आहे. (Chandrapur Election 2026 Result) जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून सुद्धा ते चंद्रपूर महानगरपालिकेत सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका हि आमदार लग्न फूकेंद्रni विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Parinay Fuke : चंद्रपुरात 100% भाजप सत्ता स्थापना करणार, महापौरही आमचाच; काँग्रेसमधील अंतर्गत कलहनंतर आमदार परिणय फुकेंचा मोठा दावा

आणखी वाचा

Comments are closed.