किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं


नागपूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit somayya) यांना भाजपने (भाजप) उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विशेष म्हणजे पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडली, अनेक नेत्यांच्या घोटाळ्यावरुन कागदोपत्री पुरावे देत त्या नेत्यांना पोलीस आणि तपास यंत्रणांकडे पाठवलं. मात्र, भाजपने त्यांना ना तिकीट दिले, ना कुठली जबाबदारी. त्यामुळे, पक्षासाठी एवढं काम करुन किरीट सोमय्यांना कुठलेही पद नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होत आहे. त्याच अनुषंगाने भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (चंद्रशेखर बावनकुळे) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, किरीट सोमय्यांना पोस्ट घेऊन काम करण्यात व्याज नसतो, ते विनापोस्ट काम करत असतात, असे बावनकुळे यांनी म्हटले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. मागच्यावेळी सुद्धा किरीट सोमय्या यांना आम्ही पोस्ट घ्या म्हटलं होतं. मात्र, त्यांनी कुठलीही पोस्ट न घेता महाराष्ट्रने भरलेले फिरून पक्षाचे काम केलं. त्यांना पोस्ट घेऊन काम करण्यात व्याज नसतो, ते विना पोस्ट ते काम करत असतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. मी पक्षाध्यक्ष असताना सोमय्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या. त्यांनी जो विषय घेतला असेल ते काम ते पूर्ण करतात. मागच्यावेळी त्यांनी जन्माचे खोटे दाखले जे बांगलादेशी लोक घ्यायचे, रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र द्यायचे. या प्रश्नावरुन त्यांनी राज्यात मोठी मोहीम राबवली असून 50 लक्षच्या वर डॉक्युमेंट त्यांनी शोधून काढले आहेत, राज्याच्या हिताचं काम त्यांनी केलंयअसेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

आमच्यात मतभेद असतील, पण मत फरक नाहीत

मी वारंवार सांगतो की, महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात पण मत फरक नाही. एखादी ठिणगी पडली असेल तर ती निवडता येते, समजूतदारीतून समजून घेता येते. काही लोक जर समजत असतील की आमच्यामध्ये खूप मत फरक आणि मतभेद आहे, तसं बिलकुल नाही. मतभेद असू शकतात मत फरक आमच्यात नाहीत. आपल्या आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी मन लावून काम करतात. कारण, कार्यकर्त्यांनी नेत्यांना मोठं केलं असते. त्यामुळे नेतेही कार्यकर्त्यांसाठी जीव लावतात, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काम केलं. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काम केले, असे म्हणत महायुतीतील ठिणगीवरुन बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा

भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची, आम्ही त्यावर काम करतोय, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

आणखी वाचा

Comments are closed.