नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात पडसाद; वडेट्टीवारांच्या अडचणी वाढणार?
विजय वाडेटीवार: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज (Jagadguru Narendracharya Maharaj) यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान, या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणेनागपूसह राज्यातील अनेक भागात आता तीव्र पडसाद उमटत असून नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्तावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांचा कडाडून निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारीही यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याच मुद्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी वडेट्टीवार यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वोट जिहाद झाला त्यावेळेला या लोकांची थोबाड शिवली होती का? त्या वेळेला फतवे निघत होते त्यावेळेला हे काही बोलले नाहीत. मात्र आता या लोकांच्या मनामध्ये भगवा ध्वज हा सलतो आहे. म्हणून हिंदू धर्माच्या विरोधात हे लोक बोलत आहेत आणि काही संघटना हे काम करत असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिली आहे.
वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे
दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या भक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भक्त आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आले आहे. तर वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे असा इशारा या आंदोलकांनी यावेळी दिला आहे.
पंढरपुरात जोडे मारो आंदोलन
अशातच या वक्तव्याचे पडसाद पंढरपूरमध्ये ही उमटताना बघायला मिळाले. नरेंद्र महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या संतप्त शिष्यगणांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला केले जोडे मारो आंदोलन केलंय. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने राज्याची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.