मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; सगळे नाx..; अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा दावा!
विजय वडेट्टीवार: जोपर्यंत तटकरेच्या (Sunil Tatkare) मनात येणार नाही तोपर्यंत रुपाली चाकणकराणवर (Rupali Chakankar) कारवाई होणार नाही. तटकरे यांनी चाकणकर यांना वाचविण्याचा काम केलंहे. आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ठरवतील. दरम्यानपेन ड्राइव्ह समोर आणा. सगळे नागडे होतील. मंत्रिमंडळातील दोन तीन जणांची विकेट जाईल, एवढं मी जबाबदारीने सांगतो. कोणी कोणी खरातची पायापासून डोक्यापर्यत सेवा केली, हे समोर येईल. आता या सगळ्यांना वाचविण्यासाठी खरातचा एनकाउंटर होऊ शकतो. असा खळबळपालक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar on Ashok Kharat: अनेक अधिकाऱ्यांनी, राजकारण्यानी यामध्ये आपले हात धुवून घेतलेत्यामुळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने (Ashok Kharat) ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालं असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाबा आहे. असा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केला आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले तेजे सोयीचा आहे ते सरकार समोर आणतंय. आधी सांगत होते आमच्या सरकाराने पाणी खरातच्या ट्रस्टला दिला. आता त्यांच्या सरकाराने ट्रस्टला दीड कोटी रुपये दिलं, त्यावर तुम्ही आता बोला. अनेक अधिकाऱ्यांनी, राजकारण्यानी यामध्ये आपले हात धुवून घेतले आहेत. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
इंधन टंचाई आधीपासून होती, मग हुशारकी सरकार का मारत होतं? राज्य आणि केंद्र सरकार सांगात होत कि कुठेही टंचाई नाही. कोरोनासारखी परिस्थिती आज होतीये. मग सर्वपक्षीय बैठक बोलवत्यामुळे आहात. असली कोणती तुमची परराष्ट्रनीती आहे? विस्तारित आमदार निवासमध्ये डाळ भात मिळतोय, फक्त गॅस नाहीये त्यांच्याकडे. नागपूरमध्ये परिवहन सेवा कोलमडून जात आहे. डिझेल नाहीये, गाड्या कसा चालवणार? असा अस्वस्थ प्रश्नहे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar : भोंदूबाबा प्रकरणातील सर्व नेत्यांची चौकशी व्हावी
एकंदरीत या भोंदूबाबा प्रकरणात सत्ताधारी किंवा इतरही पक्षाचे नेते आहेत, नाव मी घेणार नाही, पण ते फोटो दिसत आहेत त्या जिल्ह्यातील, बाजूच्या जिल्ह्यातील मोठमोठे नेते, यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले नेते, आताच्या मंत्रिमंडळात असलेले नेते देखील आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचाही फोटो दिसत आहे, दीपक केसरकर यांची काय चौकशी केली? तर सर्वांची चौकशी करायला पाहिजे. काल साताऱ्यात शंभूराजेंना धक्काबुक्की झाली. त्यांची माणसं पळवले गेले, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले त्यांच्याकडे बहुमत असताना लोकं पळवून भाजपने उपाध्यक्ष आणि अध्यक्ष केला. मंत्र्याच्या हाताला दुखापत झाली. यावरून किती छान चाललं आहे हे तीन डबे कुठ कुठल्या दिशेने पळत आहेत, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.