हैदराबादमध्ये भीषण रस्ते अपघातात प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटातील क्रू मेंबरचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाहुबली फेम अभिनेता प्रभास याचा आगामी सिनेमा फौजीचे आता शुटिंग सुरू झाले आहे. परंतु या शुटिंगदरम्यान, हैदराबादजवळ चित्रपटाच्या क्रू मेंबरचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये या क्रूमधील इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात चित्रपटाच्या सेटवर झाला नसून, चित्रीकरणाच्या ठिकाणी जाणाऱ्या एका प्रोडक्शन कारचा रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. हा अपघात रामोजी फिल्म सिटीपासून काही किलोमीटर अंतरावर घडला असून, तीन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

प्रभासच्या ४६ व्या वाढदिवशी, २३ ऑक्टोबर २०२५ ला इंस्टाग्रामवर ‘ फौजी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. ‘फौजी’ हा हनु राघवपुडी दिग्दर्शित करत असलेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. मैत्री मुव्ही मेकर्स निर्मित या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असून, मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत.

Comments are closed.