अशोक खरातविरोधात तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न; दिल्लीत हालचाली, दोन-तीन नेत्यांच्या फोटोवरही म

अशोक खरात प्रकरण: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून रोज चौकशी सुरु आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

अशोक खरातकडून दोन-तीन नेत्यांच्या फोटोवर फुली (X) मारण्यात आली होती. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटोवर फुली नसल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारला महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे अशोक खरातचा मुक्काम आयुष्यभर कारागृहात राहील, अशी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात प्रकरण – अशोक खरात प्रकरण

अशोक खरात आता मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागला आहे. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशीदरम्यान खरात म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच अशोक खरात याने आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. आतापर्यंत खरातवर 15 गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरु आहे. चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती मिळत आहे. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची तीन बँक खाती ईडीकडून सील- (अशोक खरात प्रकरण)

अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची तीन बँक खाती ईडीकडून सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून अशोक खरातने बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून खरातने फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातच्या नाशिकसह पुणे, मुंबईअहिल्यानगरमधील बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. अशोक खरातच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणीही सुरू आहे. त्यामुळे अशोक खरातच्या मालमत्तेवरही टाच येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Nashik Crime: पोलिसांच्या सततच्या चौकशीने अशोक खरात खचला, म्हणाला, ‘मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे’

Ashok Kharat Case: नकली साप, वाघ, गर्भवती महिलेवर अत्याचार…युक्तिवादानंतर न्यायाधीशांचा आरोपीला एकच प्रश्न, अशोक खरात म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.