नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अ
नवी मुंबई गुन्हे: राज्यभरात सध्या नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजत असतानाच आता नवी मुंबईतही (Navi Mumbai) असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कळंबोली भागात असणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने (Bhondu baba) काही महिलांवर काळी जादू (Black Magic) करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. (Maharashtra Crime news)
अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. अल्लाचे महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. कधी गोड बोलून त्यांना वश करायचा तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपलंस करायचा. आर्थिक , सामाजीक , शारिरिक , वैवाहिक समस्या दुर करतो असे सांगून तो लोकांना बोलवत असे. आपल्या जाळ्यात फसवून जबरदस्तीने त्याने खालापूर (Khalapur) येथे विवाहित महिलेवर अत्याचार केला. तर सांताक्रुझ येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून दोघींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही प्रकरणात बाबाजान वर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
तुमच्यावर झालेली काळी जादू काढून देतो असे सांगून महिलांना एकट्याने बोलवत असे. खालापूर येथील निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊस वर तो महिलांना घेऊ जात होता. मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्याने महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढून पूजा करण्यास भाग पाडायचा. या महिलांनी विरोध केल्यास जादूटोणा आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हा भोंदूबाबा त्यांच्यावर अत्याचार करत असे.
खालापूरप्रमाणे कळंबोली येथे सुध्दा महिलांना भेटायला बोलवायचा. आपल्या समस्या सुटतील या आशेपोटी मोठ्या संख्येने लोक त्याला भेटण्यास येत होते. लोकांच्या वाढत्या गर्दी मुळे कळंबोली मधील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याने परिवारासह येथून पळ काढला. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावण्याचे काम करीत होता. गोड बोलून , आल्लातालाचे गारूड करून भक्तांना आपलस करीत होता. यामुळे महिलांबरोबर पुरूषही त्याच्या तत्वज्ञानाला बळी पडले आहेत. अनेक पुरूषांकडून त्यांने पैसे उकळलेले आहेत. सद्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी अजून बऱ्याच महिला त्याच्या वासनेच्या शिकार झाल्याचा दावा करण्यात येतोय.
भोंदूबाबा अब्दूर रशिद उर्फ बाबाजान यांने अत्याचार केलेल्या महिलांना पाठिंबा देत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केले आहे . सर्व धर्मामध्ये भोंदूबाबा ही लागलेली कीड असल्याचा आरोप मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलाय. अशा बाबांना सर्वच पक्षांनी राजकीय सहारा न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.