पुण्यातील नगरसेवकांच्या निधी वाटपावरुन सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या, ‘आपण
मुंबई: पुणे महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप मिळाल्याचं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांकडे ’सबका साथ सबका विकास’चे आवाहन करीत शहरातील कोणत्याही एका भागाला वा गटाला झुकते माप न देता सर्व प्रभागांना समान विकास निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे, पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी सबका साथ सबका विकासचं आवाहन केलं आहे. नगरसेवकाच्या निधी वाटपावरून सर्व नगरसेवकांना पत्राद्वारे समान निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप दिल्याने पत्राद्वारे समान निधी देण्याची मागणी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
सबका साथ सबका विकास आवाहन करत शहरातील कोणत्याही एका भागाला गटाला झुकते माप न देता सर्व प्रभागांना समान विकास निधी मिळावा अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात भाजप नगरसेवकांना प्रत्येकी सात कोटीचा निधी देण्यात आला तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पाच कोटीचा निधी देण्यात आला आहे. यावरून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समान निधी देण्याची मागणी केली आहे.
Sunetra Pawar: भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी सात कोटींचा निधी
महापालिकेच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी सात कोटींचा निधी देण्यात आला असून, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यावर आता स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
Sunetra Pawar: पत्रात सुनेत्रा पवारांनी नेमकं काय म्हटलंय?
पुणे महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पदाधिकाऱ्याकडून निवेदने प्राप्त होत आहेत. आज राज्य आणि केंद्र स्तरावर आपण ‘महायुती’ म्हणून एकत्र काम करत आहोत. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ताधारी आणि मित्रपक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय पक्षांच्या सीमांपलीकडे आहेत.
कोणत्याही एका प्रभागाला झुकते माप मिळाल्यास दुसऱ्या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू शकतात. तरी ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुसार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी वाटप व्हावा यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश व्हावेत, ही विनंती.
आणखी वाचा
Comments are closed.