अशोक खरातचं प्रकरण दाबण्यासाठी तृप्ती देसाई अन् चाकणकरांमध्ये डील? रूपाली ठोंबरेच्या आरोपांवर द
पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकांसह त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी देखील हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एकीकडे विशेष तपास पथकाकडून (SIT) खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू असताना, दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत आहेत. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील यांनी तृप्ती देसाईंवर आरोप केला आहे. ठोंबरे यांच्या दाव्यानुसार, तृप्ती देसाईंकडे खरात प्रकरणाचे महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आधीच होते, पण त्यांनी ते दाबण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्याशी ‘कोट्यवधींची सेटलमेंट’ केली. तृप्ती देसाई यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत माझ्या बाबतबोलत आहेत, त्यांना त्यातून प्रसिद्धी मिळते आहे पण ती आम्ही या केलेल्या कामामुळं मिळते आहे, राहिला प्रश्न कोणीतरी सेटलमेंट केली तडजोड केली असे शब्द वापरले पण आम्ही चळवळीतल्या कार्यकर्ते आहोत आम्ही प्रामाणिकपणे महिलांच्या मुद्द्यांवरती काम करत असतो, अनेक विषय ठामपणे मांडत असतो, अशी प्रकरण मांडत असताना आमच्यावर अशा पद्धतीने आरोप करणं, म्हणजे आमच्यावर बदनामी करण्यासारखा आहे कोणती माहिती न घेता ज्या लोकांनी असे आरोप केले मला त्यांना एवढंच सांगायचं आहे यामध्ये अशोक खरात चा एन्काऊंटर होणार आहे ही बातमी कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे ज्या राजकीय महिलांकडे हे पेन ड्राईव्ह आले नाहीत माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे विश्वास ठेवून लोक माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्या माध्यमातून ते पुढे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले आहे हे काही लोकांना बघवत नाही आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे माझ्यावरती आरोप केले आहेत, रूपाली चाकणकरांबरोबर तडजोड म्हणजे ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. रूपाली चाकणकर ज्या पदावर राहिल्या नाही पाहिजेत. त्यांच्या ज्या चुका आहेत त्या मी वेळेवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे,, अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका चळवळीतल्या कार्यकर्तेला बदनाम करण्यासारखा आहे, तुमच्याकडे हे प्रकरण आलं नाही म्हणून तुम्हाला त्रास होत असेल, परंतु यापुढे खरात असेल त्याच्यासोबत जीजी लोक असतील ज्यांनी ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांच्याव कारवाई करावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे, मी मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं देसाईंनी म्हटलंय.
तृप्ती देसाई अन् चाकणकरांमध्ये कोट्यवधींची डील? ठोंबरेंचा दावा काय
रूपाली पाटील यांच्या आरोपानुसार, अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासूनच होते. मात्र, हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याऐवजी देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. यामागे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
Comments are closed.