अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. अजितदादांना जवळ करुन देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे (मराठी) यांना दूर लोटू शकतात. ही देवेंद्र फडणवीस यांची विचारपूर्वक आखलेली रणनीती दिसत आहे, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले. यावेळी अंजली दमानिया यांनी येत्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून येत्या दोन महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना काही योजना सुरु केल्या होत्या. त्या योजना आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक-एक करुन बंद केल्या जात आहेत. हा एकनाथ शिंदे यांना बाजूला सारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. याउलट सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप होऊनही पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अनेक पुरावे दिले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येमागील बडा नेता कोण? हे अजून मुख्यमंत्र्यांना कळालेले नाही का? धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर असेपर्यंत देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासावर त्यांचा दबाव राहील. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा कधी घेणार, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंना आधी समितीतून वगळलं नंतर सामावून घेतलं

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या समितीची सूत्रं आली आहेत. त्यांनी या सामितीमध्ये अजित पवार यांचा समावेश केला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांना समितीमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यावरुन शिंदे गटात तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमांत बदल करून एकनाथ शिंदे यांना  आपत्ती व्यवस्थापन समिती समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एकनाथ शिंदे यांच्या फ्लॅगशिप योजनांना ब्रेक

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता कमालीची वाढती होती. यामध्ये त्यांची जनसामान्यांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आणि लोकप्रिय घोषणांचा धडाका या दोन गोष्टींचा महत्त्वाचा वाटा होता. सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकतील आणि त्यांना थेट भावतील, अशा योजना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सुरु केल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला. तसेच ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ या दोन लोकप्रिय योजनाही बंद करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरु आहे. या सगळ्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आल्या होत्या.

https://www.youtube.com/watch?v=S6TM9AVODC8

आणखी वाचा

दलाली करणाऱ्यांना मंत्रालयात नेमणार नाही, सेनेच्या नाराज मंत्र्यांच्या खदखदीवर फडणवीसांचे उत्तर

अधिक पाहा..

Comments are closed.