गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोष

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर 2025: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनाच्या चलानबाबत सभागृहात चर्चा झाली. चाळीच्या आजूबाजूला कोणतीही पार्किंगची सुविधा नाही. चाळीचे लोक इमारतीमध्ये गेले, पण त्यांना दुचाकीसाठी पार्किंग द्यावी. तसेच ट्राफीक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढत असताना अनेक ठिकाणी मारामारीचे व्हिडीओ येतात. चलानाचे SMS देखील उशिरा येतात, असा प्रश्न (E-Challan Payment) भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सभागृहात मांडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तर दिलं. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)

चलान लवकर कसे वसूल करण्यात येतील याकडे लक्ष दिले जाणार- (Devendra Fadnavis On E-Challan)

चलान आकरल्यानंतर अनेकांना उशीरा SMS येतात, हे तथ्य आहे. चलान लवकर जावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे चलान लवकरात लवकर कसे वसूल करण्यात येतील याकडे लक्ष दिले जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात जसे बॉडी कॅमेरे आहेत ते सिस्टीम महाराष्ट्रात आणण्याचा विचार आहे. टप्याटप्याने बॉडी कॅमेरे आणण्यात येणार आहेत. बॉडी कॅमेरे हवेत, कारण अनेक भांडणाचे व्हिडीओ येतात. तू मेरे को पेहचानता नही क्या? वैगरे बोलतात, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात नियमावली तयार करणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा- (ई-चलन पेमेंटवर देवेंद्र फडणवीस)

अनेक राज्यात चलान संदर्भात विविध नियम आहेत. ज्या मशीन दिले जाणार आहेत ते फास्टटॅगशी कनेक्ट करता येईल का? कारण चलान भरले जात नाहीत, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मांडला. यावर जे लोक चलान भरत नाहीत, त्यांना पेट्रोल देऊ नये, असा काही कायदा करावा लागेल किंवा AI चा वापर करून तंत्रज्ञान आणावं लागेल, असं ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या. यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात योग्य ती नियमावली तयार केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

नगरविकास खात्याकडून आदेश दिले जाणार- (Devendra Fadnavis On Mumbai Parking)

आपण मोठं बांधकाम करत असताना दुचाकीसाठी पार्किंग दिली जात नाही. बीडीडीसाठी देखील आधी पार्किंग देण्यात आली नव्हती. ती नंतर दिली गेली. आता दुचाकी पार्किंग करण्यात यावी यासाठी नगरविकास खात्याकडून आदेश दिले जातील, कशाप्रकारे उपाय योजना करायला हवी, याबाबतही सूचना देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभेचे सभागृह लाइव्ह व्हिडिओ:

संबंधित बातमी:

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द

आणखी वाचा

Comments are closed.