भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर माहिती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणी निवेदन केलं. भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली. एसआयटीद्वारे अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अशोक खरातच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे आणि त्याची जमीन कुठं आहे यासंदर्भातील माहिती पोलिसांनी घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Ashok Kharat Propety : अशोक खरात याची संपत्ती किती?
मिरगाव, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे अशोक खरातच्या नावावर 33 एकर जमीन आहे. मिरगाव येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव, गवळाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन खरातच्या नावावर आहे. सिन्नर, तालुका सिन्नर येथे 6 एकर जमीन,शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथे अशोक खरातच्या नावावर साडे चार एकर जमीन आहे.
काकडी, तालुका राहाता, शिर्डी विमानतळ येथे 5.5 एकर जमीन आणि पाथर्डी फाटा नाशिक येथे 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट अशोक खरातच्या नावावर आहे. ओझर जिल्हा नाशिक येथे चार गुंठ्याचे तीन प्लॉट,आडगाव ता. जिल्हा नाशिक येथे 5 गुंठ्याचा प्लॉट अशोक खरातच्या नावावर आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भोंदू अशोक खरातच्या नावावर पनवेल, नवी मुंबई येथे 40 गुंठे फ्लॅट आहे. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे 180 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे. संगमनेर, पुणे येथे मुलीच्या नावावार प्लॉट आहे. शिर्डी तालुका राहता येथे साई सिल्वर ओक भागीदारीत मंगलकार्य आहे. सिन्नर, ता. सिन्नर येथे पाच जणात मिळून सहा एकर जमीन आहे. अशोक खरातकडे 12 तोळे सोने आणि पत्नीच्या नावे 20 तोळे सोने आहे. पत्नीच्या नावे डीमॅट खात्यात 1 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
पोलिसांना या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शिवनिका संस्थान मिरगाव, ता. सिन्नर, जिल्हा नाशिक या संस्थेच्या संचालक मंडळाची चौकशी करण्यात येत आहे, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले. दरम्यान, अशोक खरात याला नाशिक कोर्टानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.