सिंचन घोटाळ्यात फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणी दमानियांचा संताप
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (अंजली दमानिया) यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण सर्व कागदपत्रे दिली आहेत, त्यासंदर्भातच उद्या मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी म्हटलं. त्यामुळे, उद्याच्या पत्रकार परिषदेत त्या नेमकं कोणता खुलासा करतील, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
माझी महसूल मंत्र्यांसोबत बैठक झाली, मला समितीसमोर सर्वकाही dsपोझ करायचं आहे, आणि माहिती समितीच प्रमुख विकास खारगे यांना द्यायची आहे. हे सगळे लँडी माफिया कसे घोटाळे करतात हे सांगायचं आहे. पुण्याहून आलेले गायकवाड कुटुंबातील पेपर मी बावनकुळेंना दाखवले. १932 सालची महार वतनाची सनद, सरकारकडे जमीन दिल्यावर त्यांनी पैसे स्विकारले नाहीत, याचे देखील पुरावे दिले आहेत. पत्रांची कॉपी देखील मी त्यांना दिली आहे, गायकवाड कुटुंबांचे एक hइआरिंग घेत ती जमीन त्यांना द्यायची की नाही हे सरकार ठरवेल, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
सरकारने 42 कोटी रु. देत वागणूक रद्द करण्यासंदर्भाच नोटीस काढली, पण ती चुकीची आहे. महसूल विभागाकडे यासंदर्भात चौकशी नाही, हे सर्व कोर्टातून करावे लागेल, यातले काही पुरावे मी उद्या देणार, यात राजकारण आहे. अजित पवार यांची प्रेस कौन्सिल मी पाहिली, गेल्या १5-16 वर्षात काहीही सिद्ध झालं नाही असं ते म्हणाले. मात्र, सर्व सिद्ध झालं होतं, पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्याने सर्व बाजूला टाकण्यात आलं. मी सगळे घोटाळे उघड करण्यासाठी आता कोर्टात जाणार आहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिला. बोगस कंपन्या बनवत जमिनीचे व्यवहार झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस यांनी बाहेर काढलं आहे. मात्र, इतर घोटाळ्यात मग तुम्ही कुठेही जा, अमित शहापांकडे जा किंवा कुठेही जा, आम्ही कोर्टात जाऊ आणि प्रकरणं तडीस नेऊ, असे दमानिया यांनी म्हटलं. आपलं ते बाबल्या आणि दुसऱ्यांचं ते कॅरेटं. सुप्रिया सुळेंकडून मला अपेक्षा नव्हती, कुटुंबातील व्यक्ती आहे, मी बोलणार नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मात्र, त्यांनीही याचं समर्थन केलं, असे म्हणत दमानिया यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपेक्षा नाहीत (Devendra Fadnavis on ajit pawar)
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 2011 साली अपेक्षा ठेवली होती, ते सिंचन घोटाळ्यावर बोलत होतेअजितदादा गिरणी पिसिंग-पिसिंग असं बोलले होते. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांनी तीनदा शपथ घेतली, ह्या सर्वामुळे मला अतिशय दुःख ते घडले. अजित पवार आता फडणवीसांचे मित्र झाले आहेत. मला फडणवीस यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाहीतर धनंजय मुंडेंचे प्रकरण असो किंवा इतर गोष्टी यात सगळं हेच झालं. पालकमंत्र्याविरोधात कोणीही बोलू शकतो का? कारण तो पार्थ अजित पवार आहे, म्हणून गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात दिग्विजय पाटील एक प्यादे आहे, अथाडॉरिटी पत्र देत त्याने सही केली होती. पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांचे काढून घेतले पाहिजे, त्यांच्याकडून स्वतः: राजीनामा देणं अपेक्षित आहे, असेही दमानिया यांनी म्हटलं.
हेही वाचा
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
आणखी वाचा
Comments are closed.