सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘माणसं पैशा

विधान परिषद निवडणूक 2026 वर देवेंद्र फडणवीस: आगामी विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीला मोठा फायदा झाला होता. यावरुन शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर निवडणुकीतील (Vidhan Parishad Election 2026) हा घोडेबाजार रोखण्यासाठी आपण लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती.  या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, असे फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

यापुढे पैशांच्या जीवावर कोणी निवडून येऊ नये, म्हणून मी लोकसभेत बिल मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी एवढंच म्हणेन की, माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे तुम्हाला समजलं तर असं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे, यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर माझी हरकत नाही. माझंही मत आहे की, निवडणूक प्रक्रियेत परिवतर्न झालं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्याही माघारीबाबत भाष्य केले. बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. मुख्यमंत्री निर्णय करत नाहीत, प्रदेशाध्यक्ष करतात तो निर्णय मला मान्य असेल. बाळ माने हे आमचेच होते. रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे:  भाजपने मला तोंड उघडायला लावू नये: सुप्रिया सुळे

अलीकडच्या सगळ्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार होतो, तो बंद झाला पाहिजे. तसेच अन्य पक्षाच्या उमेदवारांना तपास यंत्रणांची भीती दाखवू नये. महाविकास आघाडीला भाजपचे नेते माघार आघाडी म्हणून हिणवत आहेत. त्यांना मी एवढेच सांगेन की, भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृत आहे, त्यामुळे काही बोलत नाही. तो माझा स्वभाव नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही ताकदीने लढू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO

Comments are closed.