स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास


देवेंद्र फड्नाविस: महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या बैठकांचं सत्र सुरु आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभागातील बैठका पूर्ण केल्या आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विभागात दौरे लावल्याचे फडणवीस म्हणाले. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्याचे फडणवीस म्हणाले.

युती झाली पाहिजे अशी आमच्या सूचना

सायंकाळी नागपूर विभागाचा आढावा घेण्यात येईल. पुढील आठवड्यात मुंबई विभागाचा देखील आढावा घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मानसिकता चांगली आहे. पार्टी देखील सज्ज आहे. आढाव्यामध्ये कार्यकर्त्यांना दिशा निर्देशके देऊन सूचना केल्याचे फडणवीस म्हणाले.
युती संदर्भात देखील सूचना देतो आहे. युती झाली पाहिजे अशा आमच्या सूचना आहेत. युती झाली नाही तरी मित्र पक्षावर कोणीही टीका करु नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं.

यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. एक देशभक्त अशा प्रकारचा संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्यदिष्ट मानव निर्मितीचा कार्य संघ करतं. प्रसिद्धीसाठी ज्या प्रकारचे पत्र देतात त्याकडे आम्ही बघत सुद्धा नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

बोगस मतदान होणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेवून

शिक्षक मतदार संघातील बोगस मतदाना संदर्भात आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे. ती तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहे. येत्या निवडणुकांमध्ये बोगस मतदान होणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. खोटे मत नोंदवून कुणालाही या ठिकाणी निवडणूक लढता येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.