सर्वच पक्षांनी सुमित्रातताईंना पाठिंबा द्यावा, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी : देवेंद्र फडसणवी
Devendra Fadnavis on Nashik Accident : नाशिक अपघातातीची घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी
नाशिक अपघातातील ती गाडी विहिरीत पडली, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर फोनवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती देखील सांगितली. खरं म्हणजे इतक्या लहान मुलांचं यात दुर्दैवी निधन झालंय. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि मध्यभागी ती विहीर होती त्यामुळे ही घटना घडल्याचा प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येते आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या लोकांना मदत घोषित केली आहे. पण त्यासोबत एक अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की, रस्त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या विहिरी आहेत, जिथे कुठे रहदारी असेल तर तात्काळ त्याचं ऑडिटकरून त्याला आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील त्या कराव्यात. इथे असं लक्षात आलं की भिंत होती. पण ती छोटी होती. ती कदाचित मोठी असती तर ते वाचू शकले असते. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. ही घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी अशी आहे. अशी अभिप्रायहे मुख्यमंत्र्यानी दिली आहे.
Baramati bypoll election: बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.