रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य; निरुपम-मनसेमध्ये राडा, फडणवीस म्हणाले…
देवेंद्र फडणवीस ऑटो टॅक्सी चालकासाठी मराठी अनिवार्य मुंबई: आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता (Marathi Mandatory For Auto Taxi Driver) येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. (Marathi Language Taxi And Rickshaw)
सरकारच्या या निर्णयानंतर सरकारमधील शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच संजय निरुपम यांनी काल दहीसरमधील रिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून होता. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि वातावरण शांत केलं. या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Marathi Mandatory For Auto Taxi Driver)
रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Marathi Language Taxi And Rickshaw)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, मराठीला प्राधान्य देणे आणि या भाषेचा प्रचार करणे यात काहीही चुकीचे नाही. पण यावरुन वाद होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. तसेच ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी भाषा शिकवली जाईल. कारण देशात कोणावरही कोणतीही भाषा सक्तीकरुन हिंसा करणे हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांना मराठी शिकता यावी यासाठी आम्ही प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत कोणावरही कोणताही अन्याय होणार नाही, याचीही आम्ही पूर्ण काळजी घेऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
🕘 रात्री ९.१० | 24-4-2026📍नागपूर.
LIVE | मीडिया संवाद#महाराष्ट्र #नागपूर https://t.co/JwpL90m4aZ
— देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) 24 एप्रिल 2026
चालकाला मराठी भाषेचं ज्ञान असणे बंधनकारक- (Marathi Language Taxi And Rickshaw)
महाराष्ट्राच्या परिवहन विभागानं मराठी भाषेच्या सक्तीसाठी मोटार वाहन नियमांमधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. तसा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावित सुधारणांनुसार, आता सार्वजनिक वाहनं आणि मीटर असलेल्या कॅब चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी, तसंच जुन्या परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी चालकाला मराठी भाषेचं ज्ञान असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा आणि राज्याच्या अधिकृत भाषेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशानं उचललेलं हे मोठे पाऊल मानलं जातंय.
मराठी येणे अनिवार्य- (टॅक्सी आणि रिक्षा परवाना महाराष्ट्र)
मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा मुद्दा पुढे आला. काही परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
संबंधित बातमी:
Video: मोठी बातमी! मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा बाटलीही फेकली
आणखी वाचा
Comments are closed.