Maharashtra News Live Updates: भिवंडीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; कुटुंबीयांच
Maharashtra Live Blog Updates: भिवंडीतील राहनाळ गावात राहणाऱ्या 35 वर्षीय नितीन विश्वनाथ वाघमारे यांच्या छातीत दुखू लागल्याने अंजुरफाटा परिसरातील नोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री आला. तेथील डॉक्टर अफात खान यांनी त्याचा टू डी इको काढला परंतु तो नॉर्मल आल्याने डॉक्टरांनी इंजोग्राफी करण्यास सांगितले त्यामध्ये छोटा ब्लॉकेज असल्याचे सांगून काढण्यासाठी इंजेक्शन व गोळ्याने ठीक होईल असे सांगितले कुटुंबीय औषध आणण्यास गेले असताना डॉक्टर अफात खान रुग्णावर उपचार न करता निघून गेले.व रुग्ण नितीन यास अतिदक्षता विभागात हलविले. याठिकाणी डॉ.देवयानी पाटील यांनी त्यांना इंजेक्शन दिले.पण या नंतर रात्री नितीन याची प्रकृती अधिक खालावली व त्याने रक्ताची उलटी केली. नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले की तुमच्याकडून परिस्थिती सुधारत नसेल तर आम्ही दुसऱ्या दवाखान्यात जातो परंतु डॉक्टरांनी जाऊ दिले नाही मात्र त्यानंतर सकाळी नितीन याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नितीन याच्या मृत्यू नंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घालत रुग्णाच्या मृत्यूस रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.तसा तक्रार अर्ज स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यात कुटुंबियांनी दिला आहे.त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात येत मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता मृतदेहाचा व्हीसेरा सुरक्षित न्याय वैद्यकीय तपासणी साठी मुंबई येथे पाठवला आहे.तर डॉक्टरांना चौकशी साठी पोलिस ठाण्यात घेऊन गेले असून या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार देण्यात आला आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर…
Comments are closed.