‘त्या’ महिलेविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात तक्रार
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ वरळीत भाजपने काढलेल्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेने संताप व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरले होते. ‘ट्रॅफिक कशाला रोखता? रस्ता मोकळा करा, गेट आऊट ऑफ हीअर’ असे तिने सुनावले होते. या महिलेविरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन हिने आज वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मंत्र्यांशी हुज्जत, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी मागणी तिने केली.
Comments are closed.