मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group Yuti: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर (Devendra Fadnavis Davos) असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेत (Kalyan Dombivali Municipal Corporation) शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या कल्याण-डोंबिवलीमधील युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्री केलं आहे. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यासंदर्भात उत्तरं देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. (Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group KDMC)

महायुतीची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये महापौर कोण बसणार? (Devendra Fadnavis Municipal Corporation Election Result)

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरुन आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र, इकडे महापौर आरक्षण सोडत जरी निघाली असली तरी महायुतीची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये महापौर कोण बसणार?, यासंदर्भात अजूनही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. अशात, मुंबईसोबतच, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख  महापालिकांसंदर्भात महापौरपदाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

श्रीकांत शिंदे काय म्हणाले? (Shrikant Shinde On MNS Alliance)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केला. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली.

नरेश म्हस्केंच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हणाले? (BMC Mayor 2026)

कल्याणप्रमाणे मुंबईतही मनसेची सोबत चालू शकते, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का, याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता राजकारणात काहीही होऊ शकतं असं सावध विधान करत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी चर्चेला एकप्रकारे हवा दिली आहे. मुंबईत बहुमताचा 114 आकडा एकाही पक्षाला ओलांडता आलेला नाही. भाजप 89, शिवसेना शिंदे गट 29, उद्धव ठाकरेंचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेंना सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युती बेरजेचं राजकारण करणार की कोणती नवी खेळी करणार, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY

संबंधित बातमी:

Municipal Corporation Reservation 2026: मुंबई, पुणेपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरक्षण जाहीर; तुमचा महापौर कोण, संपूर्ण यादी

आणखी वाचा

Comments are closed.