भाषासक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका

मुंबई : राजधानी मुंबईसह महाराष्ट्रC. मराठीचा (Marathi) मुद्दा तापला असताना एमएनएस (एमएनएस) कार्यकर्त्यांनी 29 जूनच्या रात्री मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून जोधपूर स्वीट्स अँड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून मारहाण केली होती. बाबूलाल यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. आता, मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस यांनी दिली. तसेच, मराठी भाषेचा अभिमान असणं चुकीचं नाही, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही. भाषेवरुन वाद घालणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आणि गुंडशाहीवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्रिभाषासूत्रीचा निर्णय स्वीकारणारे उद्धव ठाकरेच, त्यात उपनेत्याला ढकलणारे तेच, निर्णय कॅबिनेटमध्ये घेणारे तेच आणि समिती नेमणारे देखील तेच आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. आम्ही याबाबत समिती नेमलेली आहे, त्याचा जो अहवाल येईल त्याची अंमलबजवाणी केली जाईल, जी विद्यार्थ्यांच्या हिताची असेल. मुंबईत भाषेवरून व्यक्तींना होत असलेली मारहाण सहन केली जाणार नाही, आम्हालाही मराठी भाषा प्रिय आहे. पण, भाषेवरुन गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले.

मीरा भायंदर येथील व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एखादा मराठी व्यापारी आसाममध्ये जाऊन भाषा शिकायला वेळ लागत असेल तर त्याला मारहाण करणार का, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. खरा अभिमान असेल तर मराठी भाषा शिकवा, क्लासेस घ्या, इंग्रजीला का मग गळे लावता. स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचं आणि मराठीसाठी गळा काढायचा, असे म्हणत ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

शरद पवारांनी जय कर्नाटक म्हटले होते

गुजराती कार्यक्रमात गेल्याने जय गुजरात बोलल्याने संकुचित विचारातून टिका करणे शोभत नाही. सध्या विरोधकांकडे मुद्देच राहिले नाहीत, ज्यामुळे ते असे मुद्दे उचलतात. मला मराठीत बोलायच तर मी मराठीत बोलीन, पण दुराग्र कोणी करू शकत नाही. मागे पवारसाहेब कर्नाटकला असताना तेही जय कर्नाटक बोलले होते, याची आठवणही देवेंद्र फडणवीसांनी करुन दिली.

केडियाचं वक्तव्य चुकीचं

दरम्यान, सुशील केडिया आणि मनसे वादावरही मुख्यमंत्र्‍यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी येत नसेल तर ठीक, पण तरी मराठी येत नाही, मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणं चुकीचं नाही का? याचं समर्थन कसं होऊ शकतं, असे म्हणत केडियांना फटकारले.

हेही वाचा

मोठी बातमी : राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचाच, शिंदेंकडून दगाफटक्याची भीती : इम्तियाज जलील

आणखी वाचा

Comments are closed.