मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहूया; बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मु

धनंजय मुंडे: बीड जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी भावनिक साद माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घातली.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ही भावनिक साद दिली.

Dhananjay Munde: अजितदादांचा मला कायम वडीलकीचा आधार

मुंडे पुढे म्हणाले, “स्व. अजितदादा हे मला कायम वडिलकीचा आधार देणारे होते. माझे आणि त्यांचे नाते अतिशय वेगळे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक नाही तर जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले आहे.” दादांनी अल्प काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते, असे सांगत मुंडे यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला.

Dhananjay Munde: दादांनी मला शब्द दिला होता

ते म्हणाले की, संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 11 वसतिगृहांच्या उभारणीसाठी 159 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या संदर्भात अजित पवार यांनी स्वतः मला शब्द दिला होता, अशी आठवणही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांसमोर सांगितली.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. सुनेत्रा पवार यांनी बीड आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेतल्या.

आणखी वाचा

Supriya Sule On Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस…

Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस, नीट धोतर नेसता येत नाही अन् आम्हाला अक्कल शिकवतोय; संजय राऊतांनी धू-धू धुतलं

आणखी वाचा

Comments are closed.