ठाकरेंनी,सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, संजय शिरसाटांची बोचरी टीका
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले युवासेनेचे नेते सूरज चवन यांना मोठा आज मोठा दिलासा मिळाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाकडून सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला, 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती, अखेर आज त्यांची जामीनावर सुटका झाली. सुटकेनंतर सूरज चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत मातोश्री निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी, आज सायंकाळी 5 वाजता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, आदित्य ठाकरेंनी कडाडून मिठी मारत सूरज चव्हाणचं स्वागत केलं. तसेच, मातोश्रीवरही त्यांना घेऊन गेले. मात्र, या भेटीवर मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खोचक टोला लगावला. ठाकरेंनी कधी सूरजला जेलमध्ये जाऊन डबा दिला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचल्याचं पाहायला मिळालं. एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ… सूरज! अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे. तसेच, तुरुंगाबाहेर आलेल्या सूरज चव्हाण यांना आदित्य ठाकरेंनी कडकडून मिठी देखील मारल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाण यांच्या सुटेकचा शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांकडून आनंद साजरा होत आहे. त्यावरुन, शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांना झोपडपट्टीधारकांचा पुळका येतो हेच आश्चर्य आहे, त्यांनी 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घातले. त्यांना नाईट लाईफ आवडते, रात्री सगळे झगमग दिसतं, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंना भेटला हा त्याचा मोठेपणा आहे, या ठाकरे कुटुंबाने त्याला कधी जेलमध्ये जाऊन डबा दिला का? आदित्य ठाकरे लंडन फीरायला गेले, पण सूरज चव्हाण यांना भेटायला कधी जेलमध्ये गेले का, असा सवाल संजय शिरसाट यांनी ठाकरे-चव्हाण भेटीवर उपस्थित केला आहे. तसेच, हे लोक शिवसेना संपवायला आहेत, अशी टीकाही ठाकरेंवर केली.
संजय राऊत वेड्यासारखं बोलतात
पुन्हा एकदा संजय राऊत यांनी वेडेपणाचा कळस गाठला आहे, हा माणूस 24 तास नशेत असतो. ज्याला स्वतःची भीती वाटते तोच असं वेड्यासारखा बोलू शकतो. उठावाच्या वेळेस आम्हाला कुठे टोचले हे तुम्हाला समजलं असेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर झालेल्या टीकेवरुन संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरेंकडून जादू की झप्पी
आदित्य ठाकरेंकडून कलिना गेटवर सूरज चव्हाण यांची वाट पाहिली जात होती, तेव्हा कारमधून उतरताच सूरज चव्हाण यांनी आदित्य यांना कडकडून मिठी मारली. आदित्य ठाकरेंसोबत तिथे थोडी चर्चा झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या कारमधून दोघेही मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं दिसून आलं.
हेही वाचा
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून ‘जादू की झप्पी’
अधिक पाहा..
Comments are closed.