क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध


नवी मुंबई : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकरच्या (दिलीप खेडकर) जामीन अर्जावर सोमवारी बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील आणि रबाळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकरला जामीन दिल्यास केसवर परिणाम होवू शकतो असा युक्तिवाद केला. तर मनोरमा खेडकरला जामीन मिळूनही तपासात सहकार्य करीत नाहीसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. यानंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल 8 ऑक्टोबरपर्यंत पर्यंत राखून ठेवला.

दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या

रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मिक्सर क्लिनर प्रल्हाद कुमार या तरुणाच्या अपहरणात मुख्य आरोपी दिलीप खेडकर, प्रफुल्ल साळुंखे आणि मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रफुल्ल साळुंखेला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी दिलीप खेडकर अद्याप फरार आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी बेलापूर कोर्टात सोमवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या.

खंडणीचा प्रकार असल्याचा युक्तिवाद

प्रल्हाद कुमारला पुणे येथे आणले असले तरी त्याला मारहाण करण्यात आली नाही किंवा जीवितास हानी पोचवली नसल्याचे आरोपी दिलीप खेडकरच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. यामुळे खेडकरला जामीन मिळावा अशी त्यांनी मागणी केली.

यावर सरकारी वकीलांनी विरोध केला. क्लिनर प्रल्हादकुमार किडनॅप केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद ठेवण्यात आला. त्याला पुणे येथे घेतोन गेले. रात्रभर तळघरात ठेवण्यात आले. त्यामुळे हा अपहरण आणि खंडणीचा प्रकार असल्याने जामीन देवू नये अशी मागणी केली.

खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा विरोध

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलीप खेडकरच्या जामीनाला जोरदार विरोध केला. यावेळी त्यांनी खेडकर आणि परिवारावर याआधी असलेल्या गंभीर गुन्हांचा पाढा वाचला. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिलीप खेडकरला जामीन दिल्यास याचा केसवर परिणाम होवू शकतो. फिर्यादीवर दबाव येवू शकतो असे स्पष्ट केले.

आरोपीने घरातील डीव्हीआर (सीसीटीव्ही रेकॉर्डिंग) गायब केले आहेत. गुन्ह्यातील गाडी आणि मोबाईल फोन लपवण्यात आले आहेत. क्लिनरच्या अपहरणानंतर आरोपींनी रात्री कोणाशी संवाद साधला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या कारणांमुळे पोलिसांनी आरोपींना पोलीस कस्टडीत घेऊन तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयास सांगितले आहे.

मनोरमा खेडाकरांच्या वर्तनावर आक्षेप

पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर जामीन मिळाल्यानंतरही तपासात सहकार्य करीत नाहीत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत चौकशीसाठीची वेळ असताना वेळ गेल्यानंतर चौकशीसाठी उशीरा येत आहेत. सुर्यास्तानंतर महिलेची चौकशी करण्यास कायद्याने मनाई असल्याचे याचा फायदा मनोरमा खेडकर घेत आहे.

जामीन अर्जातील खोटे दावे

पोलिसांच्या मते, मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जात खोटे विधान करण्यात आले आहे. क्लिनरला चांगले खायला दिल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला. परंतु विक्टिम प्रल्हाद कुमार यांच्या जबाबात उलट स्पष्ट झाले की, त्याला शिळे अन्न दिले गेले. तसेच त्यांनी 'त्याला सकाळी सोडून दिले' हा दावा सुद्धा खोटा असल्याचे पोलिसांनी म्हटल?

दिलीप खेडकरच्या वर्तनाबाबत गंभीर निरीक्षणे

पोलिसांनी न्यायालयात मChहटलं च्या, 13 सप्टेंबर रोजी रबाळे परिसरात लँड क्रूझर आणि मिक्सरमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर दिलीप खेडकर यांनी मिक्सर चालकावर हल्ला करून त्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले. त्याला पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी, मोबाइल हिसकावून घेऊन पुण्यातील आपल्या बंगल्यात नेऊन तळघरात डांबून ठेवले.

पोलिसांवर कुत्रे सोडले

पोलिस लोकेशनच्या आधारे तिथे पोहोचले असता, मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून बाहेर कुत्रे सोडले आणि पोलिसांना आत येण्यापासून परावृत्त केले. या कारवाई दरम्यान दिलीप खेडकर, ड्रायव्हर साळुंखे आणि गुन्ह्यातील गाडी आतमध्ये असतानाही पोलिसांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर पोलिस स्टेशनला येतो असे सांगून आरोपी फरार झाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी उच्चशिक्षित असले तरी त्यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी केलेली कृत्ये संघटित गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. तपासाला ते अजिबात सहकार्य करत नाहीत आणि पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे सत्यशोधनासाठी त्यांना पोलीस कोठडीत घेणे अत्यावश्यक आहे.

रबाळे पोलीस स्टेशनचे तपास पथक या प्रकरणात सतत चौकशी करत असून, दिल्ली, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी तपासाचा विस्तार केला जात आहे. न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय होणार असून, पोलिसांचा दावा आहे की आरोपींना जामीन मिळाल्यास तपासावर गंभीर परिणाम होईल.

आणखी वाचा

Comments are closed.