टेम्पोचालक रस्ता चुकला आणि पाच चोरटे अडकले, विष्णूनगर पोलिसांनी सीसीटीव्हीतून घेतला शोध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चोरी करून मालासह पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांचा डाव सीसीटीव्हीमुळे उधळला आहे. चोरीचा माल घेऊन जाताना चालकाचा रस्ता चुकला आणि त्याला पर्यायी मार्गाने जावे लागले. हाच पर्यायी मार्ग चोरट्यांसाठी फास ठरला. मानकोली पुलाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो कैद झाला आणि विष्णूनगर पोलिसांना तपासाचा महत्त्वाचा धागा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पाचजणांना बेड्या ठोकल्या असून सुमारे सात लाखांच्या ॲल्युमिनियम प्लेट्सही हस्तगत केल्या आहेत.

मोटा गाव परिसरातील नामांकित शाळेच्या बांधकामाच्या ठिकाणाहून ॲल्युमिनियम प्लेट्स चोरीला गेल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. याच तपासादरम्यान मानकोली पुलाजवळील सीसीटीव्हीमध्ये चोरीच्या रात्री संशयित टेम्पो दिसून आला.

मुख्य आरोपी भंगारवाला

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. त्यातून अमित कुमार, राहुल प्रल्हाद, आदित्य खांजोडे, प्रकाश घोलप आणि सागर घाटल या पाच आरोपींचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली. अमित कुमार हा चोरीचा मुख्य आरोपी असून त्याचा भंगार विक्रीचा व्यवसाय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

Comments are closed.